महावितरणची जिल्ह्यात ७२ कोटी ४५ लाखांची थकबाकी

रत्नागिरी :- महावितरणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७२ हजार ६२३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणकडे ७२ कोटी ४५ लाख ३८ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे. आतापर्यत वसुलीमध्ये अग्रेसर असणाºया रत्नागिरी जिल्ह्यापुढे कोरोनामुळे थकबाकी वसुलीचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एकूण थकबाकीपैकी सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. ३२ हजार ३०७ ग्राहकांकडे ४४ कोटी २४ लाख  रूपयांची थकबाकी आहे.
 

सार्वजनिक पथदिपसाठी वीज पुरवठा करणाºया महावितरणचे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बिले न भरल्यामुळे थकबाकीचा अंधार पसरला आहे. १ हजार ४९५ स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सहा कोटी ४३ लाख रूपये थकित आहेत. वाणिज्यिक विभागातील २२ हजार ८३२ ग्र्राहकांकडे आठ कोटी ७० लाख ९ हजार रूपये वसूल करावे लागणार आहेत. औद्योगिकच्या ३३७५ ग्राहकांकडे पाच कोटी १२ लाख ७० हजार  रूपये थकीत आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या २४८३ ग्राहकांकडे तीन कोटी ९४ लाख ४८ हजार,  कृषीपंपाच्या ७ हजार ९९४ ग्राहकांकडे एक कोटी ५६ लाख ९ हजार रूपये थकित आहेत. सार्वजनिक विभागातील ४८८९ ग्राहकांकडे दोन कोटी लाख ८९ हजार रूपये थकित आहेत. अन्य ५४५ ग्राहकांकडे ३६ लाख १७ हजार रूपयांची थकबाकी आहे.
 

कोरोनामुळे सलग तीन महिने वीजबीले न देण्यात आल्याने वीजबिलांची रक्कम वाढली आहे. सलग तिन महिने वीजबिले ग्राहकांकडून न भरल्याने बिलांचे आकडे वाढले आहेत.महावितरणकडून वीजबिले भरण्यासाठी ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे.
रत्नागिरी विभागातील एक लाख ४५ हजार ९९७ घरगुती ग्राहकांकडे १९ कोटी ५६ लाख १६ हजार रूपये थकीत आहेत. वाणिज्यिक १०४५२ ग्राहकांकडे ४ कोटी १८ लाख १५, औद्योगिक १६०२ ग्राहकांकडे दोन कोटी २१ लाख ५६ हजार, कृषीच्या ४ हजार ३७ ग्राहकांकडे ६६ लाख ७६ हजार,   ८०७ पथदिव्यांचे ३ कोटी ८ लाख २५ हजार रूपये थकित आहेत.  सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या १२५७ ग्राहकांकडे एक कोटी ५२ लाख २४ हजार, इतर सार्वजनिक सेवांसाठी १ हजार ४६९ ग्राहकांकडे एक कोटी ३ लाख ७२ हजार, अन्य ४१० ग्राहकांकडे २८ लाख ४७ हजार मिळून एकूण १ लाख  ६७ हजार ३६ ग्राहकांकडे ३२ कोटी ५५ लाख ३० हजाराची थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील ९५ हजार ६८१ घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी ९३ लाख ६३ हजार रूपये थकीत आहेत. वाणिज्यिक ५८४२ ग्राहकांकडे १ कोटी ९९ लाख ७९ हजार, औद्योगिक ९२७ ग्राहकांकडे १ कोटी ८५ लाख १७ हजार, कृषीच्या २ हजार १९९ ग्राहकांकडे ४६ लाख ८९ हजार रूपये थकित आहेत.   ४७२ पथदिव्यांचे २ कोटी १० लाख ७२ हजार थकित आहेत. याशिवाय अन्य ७१ ग्राहकांकडे चार लाख ३४ हजार, सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या ६६८ ग्राहकांकडे एक कोटी २७ लाख ७८ हजार , इतर सार्वजनिक सेवांसाठी १२८१ ग्राहकांकडे ५२ लाख ४८ हजार मिळून एकूण दहा लाख सात हजार १४१  ग्राहकांकडे २१ कोटी २० लाख ८० हजाराची थकबाकी शिल्लक आहे

चिपळूण विभागातील ८७ हजार ३३२ घरगुती ग्राहकांकडे ११ कोटी ७४ लाख २१ हजार रूपये थकीत आहेत. वाणिज्यिक ६५३८ ग्राहकांकडे २ कोटी ५२ लाख १६ हजार, औद्योगिकच्या ८४१ ग्राहकांकडे १ कोटी पाच लाख ९७ हजार, कृषीच्या १७५८ ग्राहकांकडे ४२ लाख ४५ हजार रूपये थकित आहेत.  २१६ पथदिव्यांचे एक कोटी २४ लाख चार हजार थकित आहेत. याशिवाय अन्य ६४ ग्राहकांकडे तीन लाख ३६ हजार, सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या ५५८ ग्राहकांकडे एक कोटी १४ लाख ४५ हजार , इतर सार्वजनिक सेवांसाठी ११३९ ग्राहकांकडे ५२ लाख ६५ हजार मिळून एकूण ९८ हजार ४४६ ग्राहकांकडे १८ कोटी ६९ लाख २८ हजाराची थकबाकी शिल्लक आहे