रत्नागिरी:- रविवार सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 877 झाली आहे. दरम्यान 38 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 627 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
सोमवारी बरे झालेल्यांमध्ये दापोली येथून 12 , घरडा येथून 11, जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 1, कोव्हीड केअर सेंटर, पेढांबे येथून 3 आणि 11 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये 2 रत्नागिरीतील, कामथे येथील 1, कळंबणी 5, लांजा 1 आणि मंडणगड तालुक्यतील 4 जण आहेत.
रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार चिपळूण येथील एका 72 वर्षीय रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 31 झाली आहे. ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह ची संख्या 219 असून आज पूर्ण गद्रे कंपनी ऐवजी गद्रे कपंनी मधील कॅबस्टिक प्लांट – परिसर, मौजे शिरगाव हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सध्या 82 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 23 गावांमध्ये, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 18 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 2 आणि राजापूर तालुक्यात 6 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 11 हजार 773 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 12 हजार 477 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 12 हजार 122 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 877 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 11 हजार 233 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 355 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 355 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.