जिल्ह्यात नवे 34 कोरोना पॉझिटिव्ह

आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 900 पार झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने 34 आणि एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर एकूण 35 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

जिल्ह्यात एकुण 912 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या नव्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 2 रुग्ण, कामथे येथील सर्वाधिक 14 रुग्ण, कळंबणी 5, गुहागर 6 आणि दापोलीतील 7 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल सामील आहे यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 32 झाली आहे. सदर 70 वर्षीय महिला रुग्णास राजिवडा येथून काल जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या महिलेचा आज मृत्यू झाला. सदर महिलेचा कोणताही प्रवासाचा इतिहास नसून स्थानिक संसर्ग देखील नसल्याची माहिती आहे.