जिल्ह्यात कोरोनाचा 31 वा बळी

रत्नागिरी:-चिपळूण येथील एका 72 वर्षीय रुग्णाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 31 झाली आहे. 

दरम्यान दापोली येथून 12 घरडा येथून 8 आणि समाज कल्याण येथून तीन रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या आता 612 झाली आहे. 

रविवारी सायंकाळच्या अहवालात आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण रत्नागिरीतील आहे यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 865 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे जिल्‍ह्याचे  प्रमाण आता 70 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.