बेकायदा दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये येथील घराशेजारी बेकायदेशिरपणे २३ हजार ६५० रुपयांची देशी-विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

ही घटना बुधवार ८ जुलै रोजी सायंकाळी ७.४० वा.कालावधीत घडली. पंकज प्रकाश भाटकर (३१, रा. महाजनवाडी भाट्ये, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कोरोनाचा संसर्ग होउ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत पंकज भाटकरने आपल्या घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना देशी-विदेशी गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी ठेवली होती. ही बाब पोलिसांनी समजताच त्यांनी या ठिकाणी छापा टाकून २३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.