जिल्ह्यात 13 नवे कोरोना बाधित 

रत्नागिरी:- शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 864 झाली आहे. 
 

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीत केवळ 1, संगमेश्वर 2, कामथे 3, दापोली 2, गुहागर 2, रायपाटण 2 आणि कळंबणीत 1 रुग्ण सापडला आहे.

दरम्यान 9 रुग्णांना दापोली येथून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 570 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66 टक्के आहे.