जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

आतापर्यंत 30 कोरोना बळी; 561 रुग्ण कोरोना मुक्त      

रत्नागिरी:- खेड तालुक्यातील कुंभाड येथील एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा 08 जुलै 2020 रोजी मृत्यू झाला होता सदर मृत रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृताची संख्या आता 30 झाली आहे. शुक्रवार सायंकाळपासून जिल्ह्यात एकूण 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 851 झाली आहे. 15 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.  बरे झालेल्यांची संख्या आता 561 झाली आहे.                     

जिल्ह्यात सध्या 75 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 22 गावांमध्ये,  दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेड मध्ये 14 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
 

संस्थात्मक विलगीकरणात शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  53, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 10,  उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 3, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 7, ग्रामीण रुग्णालय गुहागर-3,  केकेव्ही, दापोली – 5 असे एकूण 82 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
   

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या  14  हजार  329  इतकी आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 11 हजार 942 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 664 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 851 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 10 हजार 778 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 278 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.  278 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.