रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विस्तार झपाट्याने होत असताना खासगी रुग्णालयातही कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. रत्नागिरीतील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
लागण झालेली महिला कर्मचारी साळवी स्टॉप येथे वास्तव्याला आहे. काही दिवसांपूर्वी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला कोरोना झाला होता. यानंतर या खासगी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लागण होऊ लागल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.