पूर्णगड येथील वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड कुर्धे येथे सर्पदंशाने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महेश्वर पांडुरंग फडके (59, रा. कुर्धे) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
 

महेश्वर फडके हे घरी असताना 8 जुलै रोजी 9 वाजताच्या दरम्यान त्यांना सर्पदंश झाला. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या मृत्यू प्रकरणी पूर्णगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.