संगमेश्वर जवळ लक्झरी बसला आग; प्रवासी सुखरुप

रत्नागिरी:- मुंबई – गोवा हायवेवर पैसाफंड हायस्कुल, संगमेश्वर येथे साई श्रृती कंपनीच्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे वेळेवर लक्षात आल्याने प्रवासी सामानासह लक्झरी बाहेर आल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. लक्झरीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

विरारहून देवगडला जाणारी साई श्रृती कंपनीची आराम बस क्रमांक एम एच 04 एच वाय 6010 घेऊन चालक धावू नानू बोडके ( 35 रा . विरार ) हा काल रात्री विरारहून 22 प्रवाशांना घेऊन देवगड येथे जाण्यासाठी निघाला. साई श्रृती कंपनीची ही बस धामणी संगमेश्वर येथे येताच बसच्या मागील चाकाला आग लागली. 

संगमेश्वरजवळ सकाळीच लक्झरीमध्ये आगीचे तांडव पहायला मिळाले. रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. चालत्या बसला कशामुळे आग लागली याची चर्चा संगमेश्वरवासियांमध्ये होती. आगीचे कारण अजून समजू शकले नाही.