जिल्ह्यात कोरोनाचा 29 वा बळी

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात आठवडाभर उपचार घेणाऱ्या 48 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 29 वर पोहचली आहे.

कोरोना सोबत श्वसन प्रक्रिया बंद होवून मरण पावलेला हा रुग्ण कुर्धे, पावस येथील होता.  सदर रुग्ण 26 जून 2020 रोजी मुंबईहून आला होता.  त्याला 4 जुलै 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेपासून तो व्हेंटीलेटरवर होता.