दिलासा; दोनशे अहवालांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- बुधवारी उशिरा प्राप्त 200 अहवालांमध्ये जिल्ह्यात केवळ 1 नवा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरी मधील आहे यामुळे आता एकूण पॉझिटिव्ह संख्या 814 इतकी झाली आहे.

बुधवारी रात्री 200 रिपोर्ट आले यामध्ये एका नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 199 रिपोर्ट निगेटिव्ह आले, ही दिलासादायक बाब असली तरी सिव्हिलमधील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. संबंधित नर्सने काही दिवसांपूर्वी कोरोना विभागात काम केले होते, सध्या त्या डायलिसिस विभागात कार्यान्वित होत्या त्यामुळे नेमका संसर्ग कुठून झाला समोर आले नसले तरी कोरोना योध्या म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे.