रत्नागिरी:- सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 263 आहे. रत्नागिरी तालुक्यात सात नवी कोरोना बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये भाट्ये रोड, राजिवडा, नर्सिंग हॉस्टेल, शंखेश्वर गार्डन गीता भुवन, मौजे नरशिंगे, मौजे साईनगर कुवारबाव गद्रे कंपनी, सन्मित्र नगर हे सात क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सध्या 74 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 24 गावांमध्ये, दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेड मध्ये 9 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 6 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.