जिल्ह्यात लॉकडाऊन 15 जुलैपर्यंत वाढला 

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव  होऊ नये यासाठी  मिशन  “ब्रेक  द  चेन” अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.

सातत्याने वाढणार्‍या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे याच पार्श्वभूमीवर सुरु असणारा लॉकडाऊन नियमित करण्यात आला. या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेल्या निर्बंधांना पंधरा जुलै 2020 पर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

1 जुलैपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीतच मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. दुप्पट, तिप्पट प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने चिंतेची बाब ठरली. सापडणाऱ्या रुग्णांमध्ये स्थानिक रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण होते.

दरम्यान बुधवारी लॉकडाऊन वाढवण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेला लॉकडाऊन 15 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.