शहर काँग्रेसकडून लॉकडाऊन कालावधी वाढवण्याची मागणी

रत्नागिरी:– जिल्ह्यात सध्या लॉकडाउनचा कालावधी ८ जुलैपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत होत असलेली भरमसाठ वाढ पाहता हा कालावधी वाढविण्यात यावा असे समाजातील विविध स्तरावर नागरिकांचे मत आहे, त्यामुळे लॉकडाउन कालावधी वाढवावा, अशी मागणी रत्नागिरी शहर काँग्रेस कमिटी, शहर अध्यक्ष श्री. राकेश चव्हाण यांनी केली आहे. 
 

अद्यापही नागरीकांच्यात कोरोना विषयक म्हणावे तसे गांभीर्य नाही. दुसरे कारण म्हणजे सीमांवर बंदी घातल्याने परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या घटली आहे. जर लॉकडाउन कालावधी वाढवला नाही तर या संख्येत भर पडण्याची भीती आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी परततील. याहून आता जी कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याजोगा झाला आहे. लोकांच्या मनातील भय लॉकडाउनच्या माध्यमातून सांभाळता येईल. त्यामुळे सर्वांच्या जीविताचा खबरदारी म्हणून प्रशासकीय पातळीवर लॉकडाउन कालावधी शासकीय नियम अटींना अनुसरून वाढविण्यात यावा, अशी मागणी रत्नागिरी शहर काँग्रेस कमिटी, शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आली आहे.