रत्नागिरीत वकिलाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- सलग दुसऱ्या आत्महत्येने रत्नागिरीत एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी एका बँक अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर मंगळवारी एका वकिलाने गळफास घेत आत्महत्या केली. अमेय सावंत असे या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. 

अमेय अजित सावंत (34) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांनी परटवणे येथील राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला गळफास बांधून आत्महत्या केली. मध्यरात्री उशिरा ही बाब लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना याची खबर देण्यात आली.  

अमेय सावंत हे बार असोसिएशनचे सदस्य होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक वकिलांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांच्या गावी मिऱ्या येथे होणार आहेत.