रत्नागिरीत नव्याने 10 कोरोना बाधित; आणखी एका सिविल स्टाफला कोरोना

वाढत्या रुग्ण संख्येमुळे तालुकावासियांची चिंता वाढली

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. सोमवारी सायंकाळी नव्याने कोरोनाचे 10 रुग्ण सापडून आले आहेत. हे रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. यात एका 11 वर्षाच्या मुलासह सिविल मधील आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आज एकूण 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंतची रुग्णसंख्या 781 झाली आहे.
 

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा साडेसातशे वर पोचला आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली मात्र या लॉकडाऊनच्या कालावधीत देखील मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
 

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या 10 नव्या रुग्णांमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. याशिवाय सिविल मधील एका ब्रदरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. खासगी रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह असलेल्या जेल पोलीसच्या मुलाला देखील कोरोना झाला आहे. राजीवडा, कुवारबाव, संभाजीनगर नाचणे, नवानगर, सन्मित्रनगर या भागातील नवे रुग्ण आहेत.