चिपळूण:- खेर्डी एमआयडीसीतील व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक अंतर न पाळता परप्रांतातून कामगारांना बसमधून आणल्याप्रकरणी शिरगांव पोलीसांनी ही कारवाई केली.
या कंपनीत कामासाठी ४२ कामगार आणण्यात आले होते. त्यांना आणताना गाडीचा चालक राजू गुप्ता, ठेकेदार रवी आणि या कामगारांना आणावयास सांगणारा व्यवस्थापक या तिघांवर कलम २६८ व २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. परप्रांतीय कामगारांचा विषय चर्चिला जात असताना पोलीसांची कारवाई लक्षवेधी ठरली आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार कोळेकर करीत आहेत