रत्नागिरी:- मंगळवारी रात्री 25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. यात एका वरीष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता 806 वर पोचली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 8 रुग्ण आहेत. यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. या अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा अहवाल देखील मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. यासह खेडशी येथील डॉक्टरच्या नातेवाईकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यासह लांजा 4, राजापूर 4, मंडणगड 4 आणि दापोलीतील 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.