जिल्ह्यात 57 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

रत्नागिरी शहर परिसरात सहा बाधित क्षेत्र

रत्नागिरी:- मौजे नाचणे गोडावुन स्टॉप, सन्मित्रनगर, मौजे नाचणे समर्थन नगर, सीईओ बंगला, मौजे निवखोल, मच्छीमार्केट ही रत्नागिरी शहर परिसरातील सहा क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

 जिल्ह्यात सध्या 57 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 17 गावांमध्ये, दापोली मध्ये 9 गावांमध्ये, खेड मध्ये 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.