रत्नागिरी:- जिल्ह्यात 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण कळंबणी येथे 15, कामथे 14 तर रत्नागिरी येथे 8 रुग्ण सापडले आहेत. जिल्हा रुग्णालयातील आणखी तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासना समोरील अडचणी वाढल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सोमवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात कामथे येथील 14, रत्नागिरीतील 8, कळंबणी 15, राजापूर 2 आणि दापोली तालुक्यातील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील आणखी तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय काल पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेंद्र नगर, श्रीराम नगर, सन्मित्र नगर, मच्छी मार्केट या भागात नवे रुग्ण सापडून आले आहेत.