गणपतीपुळे समुद्रकिनारी समुद्री कासवाला जीवदान

रत्नागिरी:- गणपतीपुळे समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिकांनी जीवदान दिले.   गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक आणि अन्य ग्रामस्थांनी जाळ्यात फसलेल्या कासवाची सुखरूप सुटका करून कासवाला पुन्हा समुद्रात सोडले.

मासेमारीच्या जाळ्यात अडकून पडलेले कासव किनाऱ्यावर तडफडत होतो. गणपतीपुळे मंदिरांचे सुरक्षारक्षक आणि स्थानिकांचे कासवाकडे लक्ष गेले. जाळ्यात अडकलेल्या कासवाला वाचवण्यासाठी राकेश सुर्वे, मिथुन माने, अमोल गुरव आणि अन्य स्थानिकांनी मदतकार्य केले. आज सकाळी 7.30 वाजता कासवाला जाळ्यातून बाहेर काढत पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. त्यांच्या या कार्याबद्दल गणपतीपुळे ग्रामस्थांकडून सर्वांचे कौतुक होत आहे.