दिलासा; तब्बल 38 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण असताना पोलीस दलासाठी दिलसादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्हा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देखील या अहवालात दिलासा मिळाला आहे. 
 

शनिवारी रात्री तब्बल 38 अहवाल प्राप्त झाले. जेल पोलीस आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अहवालाचा यात समावेश होता. स्वॅब दिल्यापासून दबावात असणाऱ्या अनेकांना या अहवालाने दिलासा मिळाला आहे. तब्बल 38 अधिकारी आणि कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.