जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातशेनजिक; आणखी 13 पाॅझिटीव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवार सायंकाळपासून 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 696 वर पोचली आहे. 

प्राप्त झालेल्या अहवालानुसार 13 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नवीन 13 रुग्णांपैकी उपकेंद्र कामथे चिपळूण येथे 3, राजापूर येथील 1, रत्नागिरी येथील 2 आणि लांजा येथील 1 रुग्ण जिल्हा कोव्हीड रुग्णालयात, खेड येथील 5 रुग्ण कळंबणी उपकेंद्र येथे, दापोली येथील 1 रुग्‍ण दापोलीत ॲडमिट करण्यात आले आहे.

सध्या अॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 209 आहे. त्यापैकी 4 रुग्णांवर रुग्णालयाबाहेर उपचार सुरू आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 61 संशयित रुग्ण दाखल आहेत तर आतापर्यंत 461 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण 49 अॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन आहेत.