रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी 24 तासात तब्बल 69 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात बडेबडे अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली. मात्र नुकत्याच पॉझिटिव्ह आलेल्या एका अधिकाऱ्याने आधी जुन्या नावाने तर नंतर नवीन नावाने कोरोनाची चाचणी केली. मात्र दोन्ही वेळा या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि या अधिकाऱ्याला कोरोनाने गाठलेच.
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे 669 रुग्ण असून यापैकी ऍक्टिव्ह 206 आणि मृत्यू 26 आहेत. गुरुवार पासून 20 पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.