सौर कृषीपंप योजनेसाठी दीड कोटींची तरतूद

शेतकर्‍यांना प्रोत्साहन; दिवसा कमीतकमी 4 तास वीज

रत्नागिरी:- कोकणातील अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात घेऊन शेतकर्‍यांना लागवडीसाठी उद्युक्त करण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषीपंप योजना राबवण्यात येत असून दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेला प्रतिसाद नव्हता; मात्र आता सौरपंपाना वीज पुरवठा करण्यात येणार असल्याने यासाठी शेतकर्‍यांकडून ऑॅनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेत कृषिपंपाना दिवसा कमीतकमी 4 तास वीज देण्यात येणार असून सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. शासनाने शेतकर्‍यांचा विचार करून लॉकडाऊन असताना विविध आर्थिक योजना नियोजित केल्या आहेत. सौर कृषिपंप योेजनेद्वारे कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी 33 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. गेल्या 2 वर्षांपासून शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी देणे बंद आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपासाठी कोकणातही लघुदाब वीज वाहिन्यांवरून नवीन वीज जोडण्या देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून ही योजना लागू करण्यात येणार आहे. सौर कृषी पंप योजना पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली असून या योजनाद्वारे प्रतिवर्ष एक लाख 5 हजार सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी 670 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेत कृषिपंपाना दिवसा कमीतकमी 4 तास वीज देण्यात येणार आहे.