जिल्ह्यातील कोरोना योद्धे पगाराच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी:- जगभरासह देशात, राज्यात, जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. कोरोना योद्धे म्हणून सरकार त्यांची पाठ थोपटत असले तरीही याच कोरोना योद्ध्यांच्या पगारासाठी शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे. 

जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयातील शेकडो वैद्यकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांची पगार बिल कोषागार कार्यालयात पडून आहेत. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी पगार निधी न आल्याने एकाही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे कोरोना योध्ये म्हणून पाठीवर कौतुकाची थाप मारणारे राज्य सरकार कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोटावर मारणार आहे का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.