गणपतीपुळे खाडीत बुडून एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- कालवं काढण्यासाठी गेलेला दिलीप गणपत शिवगण (वय 48) या प्रौढाचा कलव काढताना दम लागल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. 

यातील मयत दिलीप शिवगण हे गणपतीपुळे खाडीवर मासे, कलव, म्हारय, खेकडे पकडण्यासाठी गेले होते. हे पकडत असताना त्यांना अचानक दम लागला आणि ते खाडीच्या पाण्यात बुडाले. नजीकच मासे पकडत असणाऱ्या लोकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले व उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.