आरोग्य विभागापुढे नवा पेच; प्रयोगशाळेत टेस्टिंग किटचा तुटवडा

रत्नागिरी:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढत जाणाऱ्या तपासण्यांमुळे कोरोना तपासणी प्रयोगशाळेत टेस्टिंग किटचा तुटवड भासू लागल्याची माहिती मिळत आहे.एक ते दोन दिवस पुरतील एवढीच किट आहेत.

आरोग्य विभागापुढे आता नवा पेच निर्माण झाला आहे. नवीन टेस्टिंग किट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियामध्ये  अडकल्याची माहिती पुढे आली आहे. जर टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, तर उसनवारीवर हि कीट मागवावी लागण्याचे शक्यता आहे. ९ जून रोजी रत्नागिरीतील कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सध्या रोज सुमारे ३०० तपासण्या या प्रयोशाळेत होत आहेत. प्रयोशाळा सुरु होताना ३ हजार टेस्ट होतील इतकी कीट आली होती. त्यानंतर देखील इतर ठिकाणाहून कीट मागवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या व तपासण्या वाढल्याने या किटची कमतरता जाणवू लागली असून प्रशासन यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.