रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये आणखी एकूण 22 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 11 रुग्ण कामथे येथील असून 6 रुग्ण रत्नागिरीतील, 3 रुग्ण कळंबणी आणि 2 रुग्ण लांजा येथील आहेत.
गुरुवारी सायंकाळी 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 683 इतकी झाली आहे. सातत्याने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्ण संख्येने रत्नागिरीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.