आणखी एक अधिकारी कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात आणखी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून या संबंधित अधिकाऱ्याला सर्दी आणि ताप येण्यास सुरुवात झाली होती. या अधिकाऱ्याने खासगी रुग्णालयात स्वतःच्या चाचण्या करून घेतल्या होत्या. या अधिकाऱ्याचा स्वॅब बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला असून संबंधित अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 
 या अधिकाऱ्यासह अन्य दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.