रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आज नव्याने 47 रुग्ण आढळले असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 661 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 661 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामध्ये जेल रेाड क्वॉटर्स ता. रत्नागिरी -10, डी.एस.पी कार्यालय ता. रत्नागिरी -01, कारवांची वाडी ता. रत्नागिरी -01, परकार हॉस्पीटल ता.रत्नागिरी -01, आडिवरे ता. रत्नागिरी-01, रत्नागिरी-03, हर्णे ता. दापोली-12, खोपी ता.खेड-1, वेरळ ता. खेड-1, लोटे ता.खेड-02, आष्टी ता.खेड-02, घरडा कॉलनी ता.खेड-02, खेड-02, खेर्डी ता.चिपळूण-02, कापरेवाडी ता.चिपळूण-01, चिपळूण-02, ब्राम्हणवाडी ता.संगमेश्वर-02, मंडणगड-01 येथील रुग्णांचा समावेश आहे.