लॉकडाऊन; घरातून बाहेर पडण्यावर बंदी 

रत्नागिरी:-
●जुलै पासून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडणेस प्रतिबंध करण्यात येत आहे. 
●रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व सिमा बंद राहतील (अत्यावश्यक सेवा वगळून)
●सर्व प्रकारची प्रवासी वाहतुक (दुचाकी वाहने, तीन चाकी वाहने, रिक्षा, जीप, टॅक्सी, कार, बस) बंद राहील (अत्यावश्यक सेवा वगळून)
●अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने/ आस्थापना वगळून अन्य सर्व दुकाने आस्थापना बंद राहतील.
●सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमा होता येणार नाही. 
●कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करतेवेळी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.
●अत्यावश्यक सेवेसाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास सामाजिक अंतर किमान 6 फूट ठेवणे आवश्यक राहील. 
●दुकानावर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाहीत.
●मोठया प्रमाणात जमाव जमेल अशा कृती करण्यास प्रतिबंध राहील.
●सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास मनाई करण्यात येत आहे अशी बाब आढळल्यास कायदेशीर शिक्षा करण्यात येईल.
●सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इत्यादींच्या सेवनास प्रतिबंध करण्यात येत आहे.
●कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर, हात धुण्याचा साबण, सॅनिटायझर हे प्रवेशाच्या ठिकाणी उपलब्ध ठेवणे संबंधीत आस्थापना प्रमुखावर बंधनकारक राहील.
●कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वापर असणान्या जागा सतत निर्जतुकीकरण कराव्यात.