लॉकडाऊनच्या कालावधीत हे राहणार सुरू 

रत्नागिरी:-

●अत्यावश्यक सेवा व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संबंधित कार्यालये, आस्थापना (100 %) व अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालये (10 %) अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीसह सुरु राहतील.

●पिण्याचा पाणी पुरवठा / सांडपाणी निचरा व्यवस्थापन / स्वच्छता इत्यादी व्यवस्थापन करणा -या आस्थापना.
●सर्व बँका, पोस्टल सेवा, कुरियर सेवा, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, अत्यावश्यक सेवा देणान्या I.T. आस्थापना, ऑनलाईन शिक्षण, E – Commerce Services, उदा. Flipcart, Amazon
●अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दुध व दुधाचे पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्था. 
●मांस / मासे/ अंडी यांची विक्री दुकाने (बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी सुरु राहतील) 
●रुग्णालये व सर्व वैद्यकिय आस्थापना, औषधालये तसेच पशुवैदयकिय दवाखाने, देखभाल केंद्रे व पाळीव प्राण्यांची पशुवैद्यकिय आस्थापना व दुकाने.
●सर्व प्रकारचे उदयोग, व्यवसाय व त्यांच्या आस्थापना.
●ऑईल, गॅस, पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने पुरविणाऱ्या आस्थापना त्यांची गोदामे.
●प्रसारमाध्यमे व इलेक्ट्रॉनिक मिडीया.
●अंत्यविधी व अंत्ययात्रा (20 व्यक्ती पुरते मर्यादीत) करोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही अशा उपाययोजना करुन. 

●शासकीय कामे,शेती विषयक कामे, कृषीमाल, प्रक्रिया व साठवणूक, 
●सर्व बंदरे व त्यासंबंधी निगडीत बाबी.
 ●मद्य विक्री ऑनलाईन मागणी स्विकारुन घरपोच सेवा सुरू ठेवता येईल.
●निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची पुनर्बाधणी, पंचनामे, मदत वाटप संबंधीच्या आस्थापना 
वरील नमूद बाबी / सेवांसाठी आवश्यक प्रवास व वाहतूक, संबंधीतांकडील ओळखपत्र व त्यासंबंधीचा वाहनावरील स्वयंघोषित फलक या आधारे करता येईल. 
●वरील प्रमाणे अत्यावश्यक सेवा व त्यांच्या आस्थापना सकाळी 09.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत सुरु राहतील. सायंकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या कालावधीत केवळ वैदयकिय तपासणी कारण वगळता अन्य कोणत्याही कारणास्तव घराचे बाहेर पडता येणार नाही.