रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मागील चोवीस तासात रत्नागिरीत 3 तर दापोलीत 16 रुग्ण सापडले आहेत. 19 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 599 वर पोचली आहे.
रत्नागिरीत नव्याने तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात शिरगाव तिवंडेवाडी, राजीवडा आणि गावडे आंबेरे येथे रुग्ण सापडले आहेत. खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आढळून आलेली नर्स लहान मुलांच्या शिकवण्या घेत होती. या 13 विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी एक विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाला आहे.
राजीवडा येथील जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय गावडे आंबेरे येथीलही जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या 20 वर्षीय नातेवाईक कोरोना बाधित आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज पुन्हा 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे . दापोली तालुक्यात तब्बल 16 रुग्ण सापडले असून यामधे दापोली -1 , जालगाव -1 , हर्णे -1 , आडे- 10 , मुगीज- 1 , टेटवली- 1 , बुरोंडी- 1 असे एकूण 16 सर्व ता . दापोली तर उर्वरित 3 रुग्ण रत्नागिरी मधील आहेत . आता एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 599 झाले आहेत .