जिल्ह्यात कोरोनाचा २६ वा बळी

रत्नागिरी:- आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी दापोलीतील ६८ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. २८ जून रोजी हा वृद्ध जिल्हा रूग्णालयात दाखल झाला होता. मंगळवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासात त्या वृद्धाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाईंचा आकडा २६ वर पोचला आहे.