जिल्ह्यात आणखी 15 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 614

रत्नागिरी:- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आणखी नवे 15 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 614 वर पोहचली आहे. मंगळवारी उशिरा आलेल्या तपासणी अहवालात 15 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या 190 अहवालांपैकी 15 रूग्ण पाॅझिटीव्ह आढळल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 614 वर पोहचला आहे. यापूर्वी 439 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये कापसाळ ता.चिपळूण-03, गोवळकोट ता.चिपळूण-03, घरडा लोटे ता.खेड-06, खेड-02, घरडा  कॉलनी  -01 रुग्णाचा समावेश आहे