रत्नागिरी तालुक्यात सात नवे कन्टेन्मेंट झोन

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येसोबत अॅक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन मध्येही वाढ झाली आहे. एकट्या रत्नागिरी तालुक्यात सात नवे कन्टेन्मेंट झोन जाहीर झाले आहेत.
 

नव्याने जाहीर झालेल्या भागांमध्ये साळवी स्टॉप, उद्यमनगर, मारुतीमंदीर, चर्मालय, भाटये,  तिवंडेवाडी-शिरगाव, बौध्दवाडी-मिरजोळे  हे सात क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
 

तसेच नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्राऊंड शेजारी, झाडगाव नाका, मौजे साखरतर, मौजे मेर्वी, मौजे धामणसे, मौजे नरबे, मौजे लाजूळ, मौजे देवूड, मौजे उक्षी, मौजे नाणीज, मौजे भंडारपुळे,मौजे करबुडे कोंड, मौजे कशेळी, राजिवडा, मौजे नाचणे शांतीनगर, मौजे गणेशगुळे, ता.जि.रत्नागिरी या भागात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या कन्टेनमेंट झोनचा कालावधी पूर्ण झाला यामुळे याच्या सिमा पूर्ववत करण्यात आल्या.

जिल्ह्यात सध्या 45 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 17 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये 1, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 5 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 8 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.