रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात प्रसूतीकरिता आलेल्या पाच गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती. या पाच पैकी दोन महिलांची प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही बालकांना जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु (बालकांचा अतिदक्षता विभाग) येथे उपचाराकरिता ठेवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागातील पाच गर्भवती महिलांना देखील कोरोनाची लागण झाली. यापैकी दोन महिलांची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर लहान बालकांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली होती. यानुसार दोन्ही नवजात बालकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही बालकांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयुत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन्ही बालकांना अँटी व्हायरल ड्रग औषध देण्यात आले असून दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर आहे.