दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- दुचाकी घसरून झालेल्या अपघातात 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. दुचाकी चालवण्याचा परवाना नसताना हायगयीने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालक संतोष नारायण घाडी (42, रा. हर्चे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

या अपघातात सहदेव राघू घाडी (70, रा. हर्चे) यांचा मृत्यू झाला आहे. 25 जून रोजी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यातील दुचाकी चालक संतोष घाडी हा अॅक्सेस दुचाकी ( एमएच-04-ईसी-1548) वर सहदेव घाडी यांना घेऊन निघाला होता. दुचाकी गोळप धोपटवाडी ते सापुचेतळे मार्गे हर्चे ता.लांजा अशी निघाली होती. स्वतः कडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील संतोष घाडी दुचाकी घेवुन जात असताना 25 जून रोजी साडेतीनचे दरम्यान नाखरेफाटा या ठिकाणी आले असताना दुचाकीला अपघात झाला. या अपघातात सहदेव घाडी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

या अपघात प्रकरणी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता संतोष याने आपले ताब्यातील गाडी अविचाराने, हयगईने व भरधाव वेगाने चालवुन अपघात करुन अपघातात स्वतःचे किरकोळ दुखापतीस व स्कुटरच्या पाठिमागे बसलेले सहदेव राघु घाडी यांचे डोक्यास गंभीर स्वरुपाची दुखापत होऊन त्यांचे मरणास कारणीभुत झाला म्हणुन संतोष घाडी याच्या विरोधात पूर्णगड सागरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.