रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 560 वर पोचली आहे. तर एका कोरोना बाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या 25 वर पोचली आहे.
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 4 व कोव्हीड केअर सेंटर कोकण कृषि विद्यापीठ दापोली 3 रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर घरडा 3 रुग्ण अशा 10 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 430 झाली आहे.
दरम्यान चिपळूण येथील 54 वर्षे वयाच्या महिला रुग्णाचा कोव्हीडने मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूंची संख्या 25 झाली आहे. मरण पावलेली सदर महिला 19 जून रोजी मुंबई येथून बेशुध्द स्थितीत दवाखान्यात दाखल करण्यात आली होती. 20 जून रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिलेस मधुमहे आणि मोठ्या प्रमाणावर किडनी इन्फेक्शन होते. दाखल झाल्यापासून सदर महिला बेशुध्दावस्थेतच होती तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार होती व ती व्हेंटिलेटरवर होती.
शनिवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार साळवी स्टॉप ता.रत्नागिरी, मु.पो.कोंडगे ता. लांजा, मु.पो. देवरुख ता. संगमेश्वर, गुहागर नाका ता.चिपळूण, मु.पो. पन्हळे ता. लांजा, कामथे ता. चिपळूण या भागातून रुग्ण सापडले आहेत. सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 111 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 560 सापडले आहेत. यापैकी 430 रुग्ण बरे झाले, 25 जणांचा मृत्यू तर 111 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.