रत्नागिरी:-शनिवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 2 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात गोव्यावरून आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.
नव्याने सापडलेल्या दोन रुग्णांमध्ये कोंड्ये, तालुका लांजा येथील 1 आणि साळवी स्टॉप, ता. रत्नागिरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. संबंधित तरुणाच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथून एक व कोव्हीड केअर सेंटर केके व्ही दापोली येथून 3 रुग्ण असे एकूण 4 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 556 असून यापैकी बरे झालेले रुग्ण 424 तर मृत्यू 24 झाले आहेत. एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 108+1 आहेत.