रत्नागिरी:- रत्नागिरीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून रविवारी संध्याकाळी नवे नऊ रुग्ण सापडले आहेत. या नऊ रुग्णांमध्ये एका जेल पोलीसासह नऊजण कोरोनाग्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे एका खासगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह आलेल्या एका नर्सने शाळकरी मुलांचे क्लास घेतले आहेत. या लहान मुलांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये तिवंडे वाडीतील 3, जेल कर्मचारी 2, राजीवडा 1, मालगुंड 1, कळंबणी 1 आणि सिविल मधील 1 रुग्ण सापडला आहे.