बार्जमधील ऑइल काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

25 दिवस बर्जचा मुक्काम; कस्टडी अजून मालकाकडेच

रत्नागिरी ः- मिर्‍या येथील त्या जहाजावरील काळे ऑइल काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र जहाज अडकून 25 दिवस झाले तरी ते ‘रेस्क्यू’ करण्याचे काम धिम्या गतिने सुरू असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्ष या जहाजाची कस्टडी (ताबा) अजून मालकाकडे आहे. प्रादेशिक बंदर विभागाकडे नाही. जहाजाचे तपासणी करूनच संबंधित एजन्सी काढण्याबाबत प्रयत्न करणार आहे. समुद्र किनार्‍याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रादेशिक बंदर विभाग मात्र जहाज काढण्याबाबत एजन्सीच्या मागे आहे.

मिर्‍या येथे अडकलेले बसरा स्टार जहाजातील काळे ऑइल काढण्यास दोन दिवसांपुर्वीच सुरवात झाली. दोन दिवसात सुमारे सात हजार लिटर काळे ऑइल काढण्यात आले. आज रात्री उशिरा किंवा उद्या ऑइल काढण्याचे काम पुर्ण होणार आहे. त्यानंतर 25 हजार लिटर डिझेल काढण्याची दुसरी मोहीम हाती घेतली जाणार आहे. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन) ङ्कंचलवार यांनी जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी यांना घेऊन ही मोहीम हाती घेतली आहे.

जहाज काढण्याबाबत एजन्सीच्या प्रतिनिधींनी अन्य काही एजन्सींसी संपर्क साधला आहे. ङ्कात्र गेल्या 25 दिवसांमध्ये जहाज मिर्‍या बंधार्‍यावर आदळून जहाजाचे मोठे नुकसान झाल आहे. मात्र अंतर्गत नुकसानाची पाहणी झालेली नाही. जी एजन्सी जहाज काढण्यासाठी पुढे येणार आहे. त्या एजन्सीकडुन आदी जहाजाची तपासणी होणार आहे. त्यानंतर जहाज काढण्याबाबत निर्णय होणार आहे. मात्र ज्या वेगाने बसरा स्टार एजन्सीकडुन वेगाने हालचाल अपेक्षित होती, ती होतना दिसत नाही. त्यामुळे जहाजाचा मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.