आठवड्यातील दोन दिवस वगळता ऑनलाईन शिक्षण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार असून शिक्षकांना आठवड्यातून दोन वेळाच शाळेत बोलवता येणार आहे. उर्वरित दिवशी शिक्षकांनी वर्क फॉर्म होम करावे. मात्र गंभीर आजारी आणि 55 वर्षांवरील शिक्षकांनी प्रत्यक्ष शाळा सुरु होईपर्यंत घरुनच काम करावे अशा सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करावा लागणार आहे.

राज्यात कोराना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. या परिस्थितीला सामोरे जात शैक्षणिक सत्र वेळेवर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. राज्यातील मंबुई, ठाणे, नवी मंबुई, पालघर जिल्हयातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यात अडचणी निमाण होऊ कितील. ही बाब विचारात घेऊन शिक्षकांसाठी वर्क फॉर होमची सवलत देण्यात आली आहे. शाळा करण्याची तयारी आणि ई लर्निंगबाबत मुख्याध्यापकांनी आठवडयातून दोन दिवस बोलविल्यास शिक्षकांना उपस्थित राहावे लागणार आहे.

महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्त दाब, हृदयविकार आदी गंभीर आजार असलेल्या आणि 55 वर्षांवरील पुरूष शिक्षकांना शाळेत न बोलविता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरु होण्याच्या कालावधीपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात वर्क फॉर होमची सवलत देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांची शाळेत उपस्थिती अत्यावश्यक असेल त्याचा निर्णय मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावयाचा आहे. शिक्षकांना शक्यतो. आठवडयात एक किवा दोन दिवसांपेक्षा जास्त वेळा बोलवू नये. ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड आजारासंबंधित कामकाजासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत, त्यांना कायममुक्त करण्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधवायाचा आहे. ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेवर सर्वाधिक भर देण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
ज्या ठिकाणी शाळा क्वारंटाईनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतल्या असतील, त्या शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येईपर्यंत कोणत्याही शिक्षकांना शाळेत बोलावू नये. परिस्थितीनुरूप बदलत्या अध्ययन अध्यापन पध्दतींचा वापर करण्यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन करावे. या पत्रानुसार कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.