रत्नागिरी :- कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या-त्या परिसरामधील भाग कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (Containment Zone) जाहीर करण्यात आले आहेत. गुरुवारी रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर, मजगाव रोड हे क्षेत्र कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार संबधित क्षेत्रातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या लोकांना सदर बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.