रत्नागिरीसाठी रेड अलर्ट; एकाच दिवसात 35 कोरोना बाधित

रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण शुक्रवारी सापडून आले आहेत. एका दिवसात तब्बल 35 कोरोना बाधित रुग्ण सापडून आले आहेत. 

मागील काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबत मृत्यूचे प्रमाण देखील सातत्याने वाढत असून ही रत्नागिरीकरांसाठी चिंतेची बाब ठरत असताना मागील चोवीस तासात आलेल्या अहवालांनी रत्नागिरीकरांची झोपच उडाली आहे. रत्नागिरी शहरातील खाजगी रुग्णालयातील आणखी 3 नर्स याशिवाय 5 गरोदर मातांनाही कोरोनाची लागण झाली आहे ज्यामध्ये रत्नागिरीतील 4 व राजापूरातील एका गरोदर मातेचाही समावेश आहे.
 

नव्याने सापडलेल्या 35 रुग्णांपैकी सर्वाधिक 15 रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले आहेत. चिपळुणातील कामथे येथे 10, कलंबणी 4, दापोली 4, लांजा 1 आणि राजापूर मध्ये 1 रुग्ण सापडला आहे.