आणखी आठजण कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 519

रत्नागिरी:- गुरुवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 08 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यानंतर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 519 वर पोचली आहे.

नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जेल रोड रत्नागिरी येथील -02,  कोतवडे ता. रत्नागिरी 02, हर्णे ता. दापोली-01, गुहागर नाका ता.चिपळूण-02 आणि कांगवली ता. लांजा-01 यांचा समावेश आहे.
   

कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथून एक व केाव्हीड केअर सेंटर घरडा लवेल येथून 8 रुग्ण असे एकूण 09 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
 

जिल्ह्यात सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 519 आहेत. यापैकी बरे झालेले रुग्ण 386, मृत्यू-24 तर एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 109+1 आहेत.