त्या पोलीस कर्मचारी, आशा वर्कर्सच्या नातेवाईकांनाही कोरोनाची लागण

रत्नागिरी:- दोनच दिवसांपूर्वी कोरोना बाधित सापडलेल्या जेल पोलीस कर्मचारी याच्या पत्नी आणि मुलाचा तर कोतवडेतील आशा वर्कर्सच्या दोन मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे रत्नागिरीतील कोरोना बधितांची संख्या वाढली आहे.
 

पोलीस कर्मचारी याचा चिपळूण प्रवासाचा इतिहास आहे. या कर्मचाऱ्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन प्रत्येकाच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. यात त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
 

साखरतर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये सेवा बजावणाऱ्या कोतवडे येथील आशा वर्कर्सला कोरोनाची लागण झाली. महिलेने या कालावधीत अनेक ठिकाणी हजेरी लावल्याचे समोर आले आहे. एक मिटिंगला देखील ही महिला उपस्थित होती. या सर्वांची माहिती गोळा करण्यात आली आहे. घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी या महिलेच्या दोन मुलींचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.