जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाचशेपार 

रत्नागिरी:-  बुधवार सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 12 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पाचशे पार पोहचली आहे. जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 511 झाली आहे.

सलग तीन दिवस कोरोना बाधित रुग्णांचा सातत्याने होणारा मृत्यू  चिंतेचा विषय ठरत असताना याबाबतीत गुरुवारी दिलासा मिळाला. मागील चोवीस तासात एकही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही.      

गुरुवारी नव्याने 10 जण  बरे  झाले आहेत. कोव्हीड केअर सेंटर पेढांबे  येथून 9 आणि  संगमेश्वर येथून एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह 511 रुग्ण सापडले आहेत. यापैकी बरे झालेले रुग्ण 374, मृत्यू-24, एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-111+1 आहे.